जय देवी हरितालिके |
सखी पार्वती अंबिके ।
आरती ओवाळीतें ।
ज्ञानदीपकळिके ॥ ध्रु० ॥
हरअर्धांगी वससी ।
जासी यज्ञा माहेरासी ।
तेथें अपमान पावसी ।
यज्ञकुंडींत गुप्त होसी ॥ जय० ॥ १ ॥
रिघसी हिमाद्रीच्या पोटी ।
कन्या होसी तू गोमटी ।
उग्रे तपश्चर्या मोठी ।
आचरसी उठाउठी ॥ जय० ॥ २ ॥
तापपंचाग्निसाधनें ।
धूम्रपानें अधोवदने ।
केली बहु उपोषणें ।
शंभु भ्रताराकारणें ॥ जय० ॥ ३ ॥
लीला दाखविसी दृष्टी ।
हें व्रत करिसी लोकांसाठीं ।
पुन्हां वरिसी धूर्जटी ।
मज रक्षावें संकटीं ॥ जय० ॥ ४ ॥
काय वर्णू तव गुण ।
अल्पमति नारायण ।
मातें दाखवीं चरण ।
चुकवावें जन्म मरण | जय० देवी ॥ ५ ॥
Leave a Reply