श्रीविष्णूची आरती | Shri Vishnu Aarti Lyrics in Marathi

आवडी गंगाजळे देवा न्हाणीलें ।
भक्तीचें भूषण प्रेमसुगंध अर्पीलें ।
अहं हा धूप जाळूं श्रीहरीपुढें ।
जंव जंव धूप जळे ।
तंव तंव देवा आवडे ।
रमावल्लमदासें अहं धूप जाळिला ।
एकारतीचा मग प्रारंभ केला ।
सोहं हा दीप ओवाळू गोविंदा ।
समाधी लागली पाहतां मुखारविंदा ।
हरीख हरीख हातो मुख पाहतां ।
चाकाटल्या ह्या नारी सर्वहि अवस्था ।
सद्भवालागीं बहु हा देव भुकेला ।
रमावल्लभदासें नैवेद्य अर्पीला ।
फल तांबूल दक्षिणा अर्पीली ।
तयाउपरी नीरांजनें मांडिलीं ।
आरती आरती करूं गोपाळा ।
मीतूंपण सांडोनी वेळोवेळां ॥ घ्रु० ॥

पंचप्राण पंचज्योती आरति उजळिली ।
दृश्य हैं लोपलें तया प्रकाशांतळीं ।
आरतीप्रकाशें चंद्र सूर्य लोपले ।
सुरवर सकळकि तटस्थ ठेले ।
देवभक्तपण न दिसे कांहीं ।
ऐशापरी दास रमावल्लभ पायीं ॥ आरती० ॥

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*