Shree Surya Stuti Lyrics | श्रीसूर्यस्तुति

जयाच्या रथा एकची चक्र पाहीं ।
नसे भूमि आकाश आधार कांहीं ।।
असे सारथी पांगुळा ज्या रथासी ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ||१||

करी पद्म माथां किरीटी झळाळी ।
प्रभा कुंडलांची शरीरा निराळी ।।
पहा रश्मि ज्याची त्रिलोकासि कैसी ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ||२||

सहस्त्रद्वयें दोनशे आणि दोन ।
क्रमी योजने जो निमिषार्धतेन ||
मना कल्पवेना जयाच्या त्वरेसी ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ||३||

विधीवेदकर्मासि आधारकर्ता ।
स्वधाकार स्वाहादि सर्वत्र भोक्ता ।।
असे अन्नदाता समस्तां जनांसी ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ।।४।।

युगें मंत्रकल्पांत ज्याचेनि होती ।
हरिब्रह्मरुद्रादि ज्या बोलिजेती ।।
क्षयांती महाकाळरूप प्रकाशी ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ||५||

शशी तारका गोवुनी जो ग्रहातें ।
त्वरें मेरू वेष्टोनियां पूर्वपंथें ।।
भ्रमे जो सदा लोक रक्षावयासी ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ।।६।।

समस्तां सुरांमाजि तूं जाण चर्या ।
म्हणोनीच तूं श्रेष्ठ त्या नाम सूर्या ।।
दुजा देव तो दाखवी स्वप्रकाशी ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ।।७।।

महामोह तो अंधकारासि नाशी ।
प्रभाशुद्ध सत्त्वाचि अज्ञान नाशी ।।
अनाथां कृपा जो करी नित्य ऐसी ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ||८||

कृपा ज्यावरी होय त्या भास्कराची ।
न पाहूं शके शत्रु त्याला विरिंची ।।
उभ्या राहती सिद्धि होऊनि दासी ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ||९||

फळें चंदनें आणि पुष्पेंकरोनी ।
पुजावें बरें एकनिष्ठा धरोनी ।।
मनीं इच्छिलें पाविजे त्या सुखासी ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ।।१०।।

नमस्कार साष्टांग बापा स्वभावें ।
करोनी तया भास्करालागि घ्यावें ।।
दरिद्रे सहस्त्रादि जो क्लेश नाशी ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ।।११।।

वरी सूर्य आदित्य मित्रादि भानू ।
विवस्वान इत्यादिही पादरेणू ।।
सदा वांच्छिती पूज्य ते शंकरासी ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ।।१२।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*