श्री सिद्धकुंजिकास्तोत्रम्: स्तोत्र व माहिती | Shree Siddha Kunjika Stotram Rudrayamal Full with Importance

Shree Siddhakunjika stotram श्री सिद्धकुंजिकास्तोत्रम्: स्तोत्र व माहिती

शिव उवाच

शृणु देवि प्रवक्ष्यामि कुंजिकास्तोत्रमुत्तमम् ।
येन मन्त्रप्रभावेण चण्डीजापः भवेत् ॥१॥

न कवचं नार्गलास्तोत्रं कीलकं न रहस्यकम् ।
न सूक्तं नापि ध्यानं च न न्यासो न च वार्चनम् ॥२॥

कुंजिकापाठमात्रेण दुर्गापाठफलं लभेत् ।
अति गुह्यतरं देवि देवानामपि दुर्लभम् ॥३॥

गोपनीयं प्रयत्नेन स्वयोनिरिव पार्वति ।
मारणं मोहनं वश्यं स्तम्भनोच्चाटनादिकम् ।
पाठमात्रेण संसिद्ध्येत् कुंजिकास्तोत्रमुत्तमम् ॥४॥

॥ अथ मन्त्रः ॥

ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ॐ ग्लौं हुं क्लीं जूं सः
ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल
ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे
ज्वल हं सं लं क्षं फट् स्वाहा

॥ इति मन्त्रः॥

नमस्ते रुद्ररूपिण्यै नमस्ते मधुमर्दिनि।
नमः कैटभहारिण्यै नमस्ते महिषार्दिनि ॥१॥

नमस्ते शुम्भहन्त्र्यै च निशुम्भासुरघातिनि ।
जाग्रतं हि महादेवि जपं सिद्धं कुरुष्व मे ॥२॥

ऐंकारी सृष्टिरूपायै ह्रींकारी प्रतिपालिका ।
क्लींकारी कामरूपिण्यै बीजरूपे नमोऽस्तु ते ॥३॥

चामुण्डा चण्डघाती च यैकारी वरदायिनी ।
विच्चे चाभयदा नित्यं नमस्ते मंत्ररूपिणि ॥४॥

धां धीं धूं धूर्जटेः पत्नी वां वीं वूं वागधीश्वरी ।
क्रां क्रीं क्रूं कालिका देवि
शां शीं शूं मे शुभं कुरु ॥५॥

हुं हुं हुंकाररूपिण्यै जं जं जं जम्भनादिनी ।
भ्रां भ्रीं भ्रूं भैरवी भद्रे भवान्यै ते नमो नमः ॥६॥

अं कं चं टं तं पं यं शं वीं दुं ऐं वीं हं क्षं
धिजाग्रं धिजाग्रं त्रोटय त्रोटय दीप्तं कुरु कुरु स्वाहा ॥७॥

पां पीं पूं पार्वती पूर्णा खां खीं खूं खेचरी तथा
सां सीं सूं सप्तशती देव्या मंत्रसिद्धिं कुरुष्व मे ॥८॥

इदंतु कुंजिकास्तोत्रं मंत्रजागर्तिहेतवे ।
अभक्ते नैव दातव्यं गोपितं रक्ष पार्वति ॥

यदि कुंजिकया देवि हीनां सप्तशतीं पठेत् ।
न तस्य जायते सिद्धिररण्ये रोदनं यथा ॥

॥ इतिश्रीरुद्रयामले गौरीतंत्रे शिवपार्वती संवादे कुंजिकास्तोत्रं संपूर्णम् ॥


सिद्ध कुंजिका स्तोत्र: माहिती

नवरात्रीत नऊ दिवसात विधी-विधान पूर्वक, दुर्गा सप्तशती पाठ केल्याने देवीची अपार कृपा प्राप्त होते. नियमित रूपाने संपूर्ण दुर्गा सप्तशती पाठ करण्यास भक्तांना सुमारे दीड तास लागतो. तसेच केवळ नवरात्रीत पाठ करणार्‍यांना तीन तास लागू शकतात.

सध्याच्या धावपळीच्या काळात पूर्ण पाठ करणे अनेकदा कठिण जातं. या परिस्थितीत दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ केल्याचे फल प्राप्त करण्यासाठी एक सोपा उपाय दुर्गा सप्तशती मध्ये सुचविला आहे. जर आपण केवळ पाच मिनिटात दुर्गा सप्तशतीच्या तेरा अध्याय, कवच, कीलक, अर्गला, न्यास पाठाचे फल प्राप्त करून घेऊ इच्छित असाल तर हा उपाय आपल्यासाठी निश्चित उपयोगी ठरेल.

महादेवाने देवी पार्वतीला म्हटले की दुर्गा सप्तशतीच्या संपूर्ण पाठाचे फल केवळ कुंजिकास्तोत्र पाठ केल्याने प्राप्त होऊ शकते. कुंजिकास्तोत्र मंत्रसिद्ध असल्याने याला सिद्ध करण्याची गरज नाही. साधक संकल्प घेऊन या मंत्राचा जप करत दुर्गा देवीची आराधना करतात आणि देवी त्यांची मनोकामना पूर्ण करते.

यात लक्ष देण्यासारखे म्हणजे कुंजिकास्तोत्र मंत्रांचा जप कोणालाही त्रास देण्याच्या हेतूने करू नये. असे केल्याने साधकाचे स्वत:चे नुकसान होतं.

माहिती: Dr. Sunetra Javkar

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*