श्री स्वामी समर्थ तारक मंत्र | Shree Swami Samarth Tarak Mantra

swami-samarth-mantra-aarti-tarak-mantra

नि:शंक हो रे मना, निर्भय हो रे मना ।
प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना ।।
अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी ।
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।१।।

जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय ।
स्वयें भक्त प्रारब्ध घडवी ही माय ।।
आज्ञे वीणा काळ ना नेई त्याला ।
परलोकी ही ना भीती तयाला ।।
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।। २ ।।

उगाची भीतोसी भय हे पळू दे ।
जवळी उभी स्वामी शक्ति कळू दे ।।
जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्याचा ।
नको घाबरू तू असे बाळ त्याचा ।।
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।। ३ ।।

खरा होई जागा श्रद्धेसहित ।
कसा होशी त्याविणा तू स्वामीभक्त ।।
कितीदा दिला बोल त्यांनीच हात ।
नको डगमगू स्वामी देतील साथ ।।
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।। ४ ।।

विभूती नमन नामध्यानाधी तीर्थ ।
स्वामीच या पंचप्राणामृतात ।।
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती ।
न सोडी कदा स्वामी जया घेई हाती ।।
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।। ५ ।।

swami-samarth-mantra-aarti

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*