
श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव, श्रीदत्तास्मान्पाहि देवाधिदेव ।
भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते, घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥ १ ॥
त्वं नो, माता त्वं पिताऽऽतोऽधिपस्त्वं, त्राता योगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वम्
त्वं सर्वस्वं नः प्रभो विश्वमूर्ते, घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥ २ ॥
पाप तापं व्याधिमाधिं च दैन्यं, भीतिं क्लेशं त्वं हराऽशु, त्वदन्यम् ।
त्रातारं नो वीक्ष ईशास्तजूर्ते, घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥ ३ ॥
नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता, त्वत्तो देव त्वं शरण्योऽघहर्ता ।
कुर्वात्रेयानुग्रहं, पूर्णराते, घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥ ४ ॥
धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं, सत्संगाप्तिं देहि मुक्तिं च भुक्तिम् ।
भावासूक्तिं चाखिलानन्दमूर्ते, घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥ ५ ॥
श्लोकपंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम् ।
प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् ॥ ६ ॥
॥इति श्रीमद्वासुदेवानंदसरस्वतीकृत- घोरकष्टोद्धरणस्तोत्रं संपूर्णम्॥
॥ श्रीपाद श्रीवल्लभ श्रीगुरुदेव दत्त ॥
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
सर्वशक्तिशाली घोरकष्टोद्धरण दत्त स्तोत्र:
“घोरकष्टोद्धारण स्तोत्र” दत्त संप्रदायातील अति प्रसिद्ध स्तोत्र असून, दत्त सांप्रदायिक नेहमीच या स्तोत्राचे पठन करीत असतात. या स्तोत्राच्या माध्यमातून भाविक श्री दत्ताना विनंती करतात की, हे प्रभू मला या जीवन मरणाच्या जाचातून मुक्त कर. मानवी जीवन हे जन्म मरणाच्या बंधनात गुंतले असून त्यातून माझी सुटका कर.
प्रत्येक मानवाला त्याच्या जीवनांत जीवन जगतांना येत असलेल्या चांगल्या वाईट अनुभवापासून बोध घेत तो ईश्वराकडे हात जोडून प्रार्थना करतो की, परमेश्वरा हे जीवन नश्वर आहे मला यातून मुक्त कर.अश्या प्रकारची विनवणी भक्त श्री दत्त यांना या स्तोत्राच्या माध्यमातून करीत आहे. “घोरकष्टोद्धारण स्तोत्र” या नावामध्येच या स्तोत्राचा पूर्ण अर्थ दडला आहे.
घोरकष्टोद्धारणस्तोत्र या शब्दाची घोर+कष्ट+उद्धार अश्या शब्दांत फोड केल्यास आपल्या निर्दर्शनात येईल की, मनुष्य जन्म हा पाप आणि पुण्य याच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी मिळाला असून यापासून आपली सुटका झाल्यानंतरच आपणास मोक्ष प्राप्त होईल. मानवी जीवन हे अनेक प्रकारच्या दुखाने भरले असून, त्यामुळे यापासून आपली सुटका व्हावी याकरिता मानव खूप तडफडत आहे.
मानव जीवन मरणाच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी करीत असलेले प्रयत्न पाहून प.पू. श्री सद्गुरू भगवान श्री श्रीपाद वल्लभ स्वरूप प. पू. श्री वासुदेवानंद सरस्वती, श्री टेंबेस्वामी यांनी मिळून या “घोरकष्टोद्धारण स्तोत्राची” रचना केली आहे. या स्तोत्राचे पठन केल्याने आपले मानवी जीवनाशी संबंधित अनेक अनेक प्रकारच्या संकटापासून सुटका होवून भक्ती मार्गावर चालण्याचा आपणास लाभ मिळतो.
श्री मुखातून मिळालेल्या या स्तोत्राच्या पठणाने सद- धर्माविषयी प्रेम, सु-मती, भक्ती, सत-संगती यांची प्राप्ती होते. त्यामुळे शेवटी याच देहात सर्व ऐहिक आणि पारलौकिक कामनांची पूर्तता होते. परिणामी आपणास मुक्ती या चतुर्थ पुरुषार्थाचा लाभ होतो. धर्म, कर्म, अर्थ आणि मोक्ष या चार पुरुषार्थाची पूर्तता झाल्यानंतर भक्ती या पाचव्या पुरुषार्थाची प्राप्ती होते.
अश्या प्रकारे या पाच श्लोकांचे नित्य पठन करणाऱ्या व्यक्तीचे सर्वार्थाने मंगल होते. शिवाय, असा भक्त श्री दत्तात्रेय यांना प्रिय होतो.
आवडल्यास जरुर कळवावे. खालील माहितीचे/लेखाचे copyrights फक्त माझ्याकडे आहेत. copyright चा भंग करु नये. म्हणजेच कोणताही स्क्रीनशॉट काढू नये. तसेच copy paste करू नये. या लेखाची लिंक तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.
Leave a Reply